
स्थैर्य, 10 फेब्रुवारी, सातारा : मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त सातारा नगरपालिका आणि मसाप, पुणे शाहूपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्ममाने रविवार दि.1 मार्च रोजी कादंबरीविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे मार्गदर्शन ’ पिपीलिका मुक्तिधाम ’ ’चिंबोरे युध्द ’यासारख्या दर्जेदार कादंबर्यांचे प्रसिध्द लेखक डॉ. बाळासाहेब लबडे हे करणार आहेत. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून मोफत आहे. ही कार्यशाळा रविवार दि.1 मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे. त्यासाठी प्रवेश मर्यादित आहेत तरी ज्यांना या कार्यशाळेसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी दि. 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य असून नोंदणीसाठी सचिन सावंत मोबाईल नं. 9860522706 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मसाप, पुणे शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.
