दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये,मंगळवार
दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी मराठी विभागाने सिनेमॅटोग्राफी : कला व शास्त्र’या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मुरूम ता.बारामती येथील अनिकेत फरांदे व छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी तुषार बोकेफोडे यांनी मार्गदर्शन केले. कॅमेराचे लेन्स, बॉडी,आएसओ ,शटर स्पीड ,अपेर्चर,केलवीन,व्हाईट बॅलन्स,फ्रेम रेट,कन्पोझीन यांची माहिती यावेळी अनिकेत फरांदे यांनी दिली. फोटो काढण्याचे विविध प्रकार त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यशाळेत प्रारंभी अनिकेत फरांदे म्हणाले की ‘’फोटोग्राफी हे तंत्र असले तरी ती कला आहे. स्वतःची शैली त्यातून उभी राहते असेही त्यांनी सांगितले.फोटो हे पाहणारयाच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी काढले जावेत.फोटोतून संदेश देता येतात,वस्तू व्यक्ती किंवा दृश्य याचे सौंदर्य फोटोतून प्रकट होत असते. फोटो ग्राफरला अनेकविध ठिकाणी पर्यटन करण्याची संधी प्राप्त होते.लोकांच्यात मिसळता येते,विविध संस्कृती टिपता येतात. चांगले फोटो काढले तर लोकांच्या आदराचा विषय होता येते. आणि ग्राहक देखील मिळतात.यासाठी अधिकाधिक कौशल्ये प्रयोग करून मिळवावीत. आपण स्वतः चांगले फोटोग्राफर झालो तर आपल्याकडे पैसा येत राहतो तसेच प्रतिष्ठा देखील मिळत असते असे सांगून त्यांनी समाजाच्या फोटो विषयक गरजा ,शुटींग इत्यादी बद्दलची माहिती दिली. यावेळी छत्रपती शिवाजी कॉलेज येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे, डॉ.कांचन नलावडे ,डॉ.विद्या नावडकर डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सिनेमटोग्राफी बद्दल बोलताना ते पुढे म्हणाले ‘दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारा आवश्यक तो दृश्य परिणाम या साध्य करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम सिनेमॅटोग्राफर करत असतो. सिनेमॅटोग्राफर होण्यासाठी रंगसंगती आणि प्रकाशाचे महत्त्व माहीत असण्याची गरज असते. स्वत: ची कलादृष्टी, चित्रपटातील कथा , काळ याची उत्तम तांत्रिक माहिती हवी .योग्य प्रशिक्षण घेणे,सतत अनुभव घेणे यातून ही कला आत्मसात होते असेही ते म्हणाले.
दुसऱ्या सत्रात त्यांनी प्रत्यक्ष फोटो घ्यायचे कसे ते शिकवले ,शिवाय दृश्य चित्रीकरण करून दाखवले ,आणि माहिती दिली.त्यांनी स्वतः काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी पाहिले ,विविध व्यक्तिरेखा आणि त्यांचे भाव कसे टिपलेत याची माहिती त्यांनी यावेळी दिली. फरांदे यांचे फोटोग्राफीने विद्यार्थी प्रभावित झाले.