दैनिक स्थैर्य । दि.१० एप्रिल २०२२ । सातारा । मुधोजी महाविद्यालय च्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने आयोजित केलेली प्रशासकीय कर्मचाऱ्यांची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या विशेष कक्षाचे डॉ. प्रमोद पांडव यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या आस्थापनांमध्ये असणाऱ्या विविध पदांचा आकृतीबंध स्पष्ट करून जेव्हा प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणत्याही कामकाजाचा अनुभव प्राप्त होईल तेव्हा त्या महाविद्यालयाचे प्रशासन हे कार्यक्षम मानले जाईल असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाच्या प्रशासनानेही कर्मचाऱ्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले पाहिजे तसेच समान वागणूक दिली पाहिजे त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत असे सांगताना कर्मचाऱ्यांनी सौजन्याने सहकार्याने सिस्तीने व प्रामाणिकपणे काम करत असताना कार्यालयीन कामकाज आतील गोपनीयता राखली पाहिजे व त्याबरोबरच संस्था निष्ठा जोपासताना संस्थेच्या ध्येयधोरण आळा अनुसरून झोकून देऊन काम केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने कर्मचारी कौतुकास पात्र ठरेल.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये निवृत्त प्राचार्य दिलीप राजवाडा यांनी मार्गदर्शन करताना हिशोबाच्या नोंदी करताना तसेच सेवा पुस्तकाच्या नोंदी करताना आणि रजेच्या नोंदी करताना कोणकोणते बारकावे महत्त्वाचे असतात हे स्पष्ट केले त्यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये कर्मचाऱ्यांनी चोखपणे काम करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी विविध प्रकारच्या या नोंदी करताना त्या वेळच्या वेळी करणे व वरिष्ठांच्या स्वाक्षरीने सर्व दप्तर वेळेवर येणे अतिशय महत्त्वाचे असते हे नमूद केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कदम पी एच यांनी केले तेव्हा ते बोलताना असे म्हणाले की अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाची असून त्यामुळे बदललेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचाऱ्यांनी नवे बदल आत्मसात केल्यास कार्यालयीन कामकाजात अचूकता येईल. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिंदे टी पी.यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री कुमरे डी एन यांनी केले या कार्यशाळेसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण कृषि महाविद्यालय फलटण उद्यानविद्या महाविद्यालय फलटण तसेच विधी महाविद्यालय फलटण व विविध महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दीक्षित एस जी व प्रा. ठोंबरे एस.डी आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य उपस्थित होते.