दैनिक स्थैर्य । दि.१० जानेवारी २०२२ । सातारा । सातारा येथील जुन्या एमआयडीसीमध्ये असणाऱ्या अजमेरा ॲटोमोबाईल सर्व्हिस सेंटरच्या कम्पाऊंडमध्ये लावलेल्या टेम्पोतून एका कामगाराने साडेतीन हजार रुपयांचे डिझेल चोरुन नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनोळखी कामगारानेच डिझेलवर डल्ला मारल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कृष्णा अशोक वाघमोडे (वय ३४, रा. देवकरवाडी, पो. निगडी, ता. सातारा) हे ड्रायव्हर असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. ४ रोजी सायंकाळी सहा ते दि. ५ रोजी सकाळी आठ वेळेत त्यांनी जुन्या एमआयडीसीमध्ये असणाऱ्या अजमेरा ॲटोमोबाईल सर्व्हिस सेंटरच्या कंपाऊंडच्या आत त्यांचा टेम्पो लावला होता. मात्र, येथून कोणीती अनोळखी कामगाराने टेम्पोतील साडेतीन हजार रुपयांचे ३५ ते ४0 लिटर डिझेल चोरुन नेले. याबाबतची तक्रार कृष्णात वाघमोडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक इंगवले करत आहेत.