वेळोशीच्या उपसरपंचासह कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश


दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025। फलटण । माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत वेळोशी, ता फलटण ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सतिश शिरतोडे, सदस्य अनिल जाधव, प्रकाश जाधव (बाबु शेठ), रविन्द्र मदने तसेच उमाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे होते. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याहस्ते उपसरपंच सतिश शिरतोडे व सहकार्यांचा सत्कार करण्यात आला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, सध्या फलटणला महायुतीचा आमदार आहे. तालुक्यात मोठ्याप्रमाणात विकासकामे सुरू आहेत. भविष्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्यामार्फत व भारतीय जनता पक्षाच्यावतीने वेळोशी गावात विकासकामांकरिता भरघोस निधी दिला जाईल. सतिश शिरतोडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!