विशेष श्रमिक रेल्वेने तीन जिल्ह्यातील मजूर बिहारकडे रवाना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नांदेड, दि. 25 : लॉकडाऊनमुळे देशभर नागरिक, मजूर अडकले आहेत. नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिहारी नागरिक अडकलेले आहेत. नांदेडमध्ये एक हजार नागरिक असल्याचे लक्षात आल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेऊन नांदेडसह इतर जिल्ह्यातील अडकलेल्या बिहारी नागरिकांसाठी विशेष “श्रमिक एक्सप्रेस” आज सकाळी 11 वा. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून सोडण्यात आली.

ही विशेष श्रमिक एक्सप्रेस आरारिया, दानापूर (पटणा) आणि खागारिया या तीन स्थानकावर थांबणार आहे. नांदेड प्रशासनाने प्रत्येकाची आरोग्य तपासणीसह पाणी आणि डबाबंद जेवण सोबत दिले असून यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाचा सहभाग घेऊन अत्यावश्यक वस्तू सोबत दिल्या आहेत. या तीन जिल्ह्यतील जाणाऱ्या नागरिकांचा रेल्वे, आरोग्य  आणि इतर बाबींचा समन्वय उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!