दैनिक स्थैर्य | दि. १२ डिसेंबर २०२४ | फलटण |
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत साठे (ता. फलटण) येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
साठे सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर गणपत मिंड, मार्केट कमिटी चे माजी सदस्य युवराज नारायण मिंड, अमरदीप इवरे, संदीप गावडे, माजी उपसरपंच रुपेश युवराज मिंड, माजी सरपंच कपिल तुकाराम मिंड, समरदीप मिंड, संजय शंकर मिंड, अक्षय मिंड, तेजस अंकुश मिंड आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
या सर्वांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.