पालिका कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन


स्थैर्य, सातारा, दि. ०७ : करोना  काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.पालिकेच्या इमारतीच्या परिसरात कोपरा बैठक घेऊन आंदोलनबाबत माहिती देण्यात आली. निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या आंदोलनात अमित गाडे, सागर गाडे, संदीप पातसुटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसात काम करताना कर्मचाऱ्यांना रेनकोट व साहित्य उपलब्ध करून द्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने द्यावीत. 50 लाखाचा विमा द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम द्यावी, आदी मागण्या नमूद केल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!