स्थैर्य, सातारा, दि. 01 : सातारा पालिकेच्या बांधकाम विभागात बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांच्या विभागात तीन तेरा वाजले आहेत. सदरबझार परिसरात पावसात काम सुरू होते.हे काम किती टिकणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.पालिकेचा अजब कारभार सुरू असून टक्केवारीसाठी हे काम रेटून नेले जात आहे, असा आरोप होत आहे.
सदरबझार परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे.हे काम घाई गडबडीत केले जात असून जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात काम होणे अपेक्षित होते.आता हे काम पालिकेच्या ठेकेदाराने हाती घेतले आहे.अवकाळीच्या झालेल्या पावसात ही रविवारी हे काम सुरू होते.ठेकेदाराने घाई गडबडीत काम हाती घेतल्याने दर्जेदार रस्ता होणार का?,पहिल्याच पावसाळ्यात केलेला रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान टक्केवारीसाठी पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप होत आहे.