मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत कामाची गुणवत्ता व दर्जा राखून वेळेत कामे पूर्ण करावी – जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । मुंबई । मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे पूर्ण करताना कामाची गुणवत्ता, दर्जा सांभाळूनच कामे वेळेवर पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मृद व जलसंधारण विभागामार्फत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर मंडळांतर्गत सर्व जिल्ह्यातील मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम, राज्यस्तर योजना, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत 0 ते 600 हेक्टर सिंचनक्षमतेच्या सर्व योजनांचा आढावा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी या विभागाचे सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्यासह विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. गडाख म्हणाले की, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत साधारणपणे 2,500 ते 3,000 प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच ही कामे करीत असताना कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहील याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रगतीपथावरील योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करीत असताना कोणत्याही तक्रारी येणार नाही याकडेही विशेष लक्ष देण्यात यावे. योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी नियमित स्वरुपात स्थळ पाहणी करणे, जिओ टॅगिंग करणे, डॅशबोर्डवर माहिती भरणे तसेच दुरुस्ती व प्रगतीपथावरील सुमारे 4000 योजना पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश श्री.गडाख यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!