फोटो नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचे काम सुरू; आक्षेप असल्यास दोन दिवसात कळवा – प्रातांधिकारी मिनाज मुल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१२: 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कुटंबातील दुबार,मयत,स्थलांतरीत मतदारांची नावे कमी करणे, कृष्णध्वल छायाचित्राऐवजी रंगीत फोटो घेणे, नाव, लिंग, वय, पत्ता, रंगीत फोटो, याची माहिती घेऊन दुरुस्ती करणे या अनुषंगाने सर्व कामकाज केलेले आहे. परंतू सदर मोहिमे अंतर्गत मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो प्राप्त न झालेने सदर मतदार स्थलांतरीत झालेत अगर कसे याची खातरजमा करता येत नाही .
मतदार यादीच्या छायाचित्र पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान दि.15जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव आहे परंतू फोटो नाही असे 262 सातारा मतदारसंघातील सातारा तालुक्यामध्ये 12354 मतदारआहेत. त्यापैकी 611 मतदारांचे फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. उर्वरीत 11743 मतदारांचे फोटो कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत. मा निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे फोटो संकलित करण्याचे काम सुरु आहे.वारंवार सुचना देऊनही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे फोटो जमा होत नाहीत. सदर मतदार हे त्या यादीभागात राहात नसल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे फोटो संकलित करणे शक्य होत नाही.अशा सर्व मतदार यांनी स्वताचे फोटो नमुना 8 भरुन आपले भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसिल कार्यालय सातारा निवडणूक शाखा यांचेकडे जमा करणेबाबत कळविण्यात आलेले होते. परंतु अद्यापही फोटो जमा झालेले  नसल्याने सदर मतदार यादीभागात राहत नसल्याचे दिसून येत आहे. मा.आयुक्त  महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक ईएलआर-2021 प्र.क्र.143/21/33 दिनांक 8 जून 2021 अन्वये मतदार नोंदणी अधिनियमाच्या नियम 1960 मधील नियम 13(2) नुसार विधानसभा मतदार यादीत नाव असलेला कोणताही मतदार त्या संबंधीत विधानसभा मतदार यादीतील नाव नोंदणीस नमुना 7 भरून आक्षेप नोंदवू शकतो त्यामुळे तहसिल कार्यालय, सातारा येथे फोटो नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचे काम सुरू आहे. याबाबत कोणाचाही काही आक्षेपअसल्यास दोन दिवसात कळविण्यात यावे. त्याबाबत केलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही, असे 262 सातारा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा  उपविभागीय अधिकारी, सातारा मिनाज मूल्ला यांनी सुचित केले आहे. 262सातारा विधानसभा मदार संघांतर्गत सातारा तालुक्यात समाविष्ट असणाऱ्या फोटो नसलेल्या मतदारांची यादी www.nic.satara.in या संकेतस्थळावर  पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Back to top button
Don`t copy text!