स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९: महाराष्ट्रातील मंदिरं बंद असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून राज्यपाल
कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला होता.
यावरून उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना उत्तर दिलं होत. या वादावर केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला दिल्ला
दिला आहे. कोश्यारी शब्द जपून वापरायला हवेत, असं शहा म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना लिहिलेलं पत्र मी वाचलं आहे. या पत्रात कोश्यारी यांनी काही संदर्भ
दिले आहेत. कोश्यारी यांनी शब्द जरा जपून वापरायला हवे होते. त्यांच्या
शब्दांची निवड चुकली, असं अमित शहा म्हणाले.
अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अमित शहा यांनी
शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एनडीएत
३० हून अधिक पक्ष आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे स्वत:हून एनडीएतून
बाहेर पडले आहेत. आम्ही नाही त्यांना बाहेर काढलं. आम्ही काय करू शकतं.
दोन्ही पक्षांचा कृषी विधेयकांना विरोध आहे. शिवसेनेसाठी दार उघडं किंवा
बंद असं काही मुद्दा नाही. तसं काही घडलेलं नाही, असं अमित शहा यांनी
स्पष्ट केलं.