स्वराजच्या नागपंचमी महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन


दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । फलटण । भाजपा महिला मोर्चा, स्वराज फौंडेशन व माऊली फौंडेशन यांच्या माध्यमातून संयुक्त रित्या आयोजित करण्यात आलेल्या नागपंचमी महोत्सवाला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला. यावेळी फुगडी, झोका व उखाणे या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा स्वराज फौंडेशनच्या अध्यक्षा ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरीस कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी स्वराजची मानाची साडी व सोन्याची नथीचे वितरण ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी अनुप शहा, उषा राऊत, मनिषा नायगावकर, पल्लवी भाजने, रसिका भोजने, माधुरी कोरडे, रूपाली सांळुखे, शुभांगी रासकर, संगीता भोसले, संगीता देशमाने, लक्ष्मी काळे, रेखा यादव, आसमा शेख, पद्मा चांडक, हिना शेख, तसलिमा आतार, शितल मोहीते, पुनम मोहीते, अनिता खटावकर, लता यादव, पुजा चिंचकर, सुनिता कर्वे आदींची उपस्थीती होती.


Back to top button
Don`t copy text!