
दैनिक स्थैर्य | दि. ७ मार्च २०२३ | फलटण |
जागतिक महिला दिनानिमित्त संतकृपा उद्योग समूह व ग्रामपंचायत आळजापूर यांच्या वतीने महिला बचत गट मेळाव्याचे बुधवारी सकाळी १०.०० वाजल्यापासून हनुमान मंदीर, आळजापूर येथे आयोजन केले आहे.
या बचत गट मेळाव्यात महिलांसाठी टेलरिंग कोर्स व विविध कोर्सेसचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मनोरंजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा ठेवण्यात आले आहेत.
या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा संसाधन व्यक्ती (पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग) सौ. सुनीता सावंत उपस्थित राहणार आहेत. सुवर्ण स्पर्श फाऊंडेशनच्या सौ. शबाना पठाण या महिला सबलीकरणावर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच श्रद्धा फाऊंडेशनचे श्री. कृष्णाथ गुरव सर हेही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्याचे उद्घाटन फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्माताई भोसले, सौ. प्रतिभाताई धुमाळ यांच्या हस्ते होणार आहे.
मेळाव्यास संतकृपा महिला पतसंस्था आळजापूर, आरोग्य विभाग स्टाफ व सर्व महिला बचत गट यांचे विशेष सहकार्य आहे.