दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । सातारा । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून सावित्री बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत एकूण 82 महिला दुचाकी स्वरांनी सहभाग नोंदवला सातारा नगरपरिषद राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचे चित्र पहावयास मिळाले
रॅलीची सुरुवात गांधी मैदान येथून सुरू झाली. रॅली खालच्या रस्त्याने पोवई नाका पोवई नाका ते राजपथ रस्त्यावरून पुन्हा गांधी मैदान अशी नेण्यात आली सातारा नगर परिषदेच्या लेखाधिकारी आरती नांगरे यांनी सावित्री रॅलीला हिरवा झेंडा दाखविला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुकन्या योजनेअंतर्गत नगरपरिषदेच्या शाळांमधील मुलींचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडण्यात आले स्वच्छतेचा आणि महिला सबलीकरणाचा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये अडीचशे महिला सहभागी झाल्या होत्या
पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात आले यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड सागर बडेकर भांडार विभागाचे देविदास चव्हाण बांधकाम विभागाचे अभियंता सुधीर चव्हाण याशिवाय सातारा शहर स्तर संघाच्या आशा मुळीक सुवर्णां कड कोमल माळी उषा कुडाळकर रूपाली गाढवे मयुरी राजेश शिर्के भाग्यश्री पवार स्वाती इंगवले अर्चना जाधव अश्विनी मस्कर व स्वाती संचलया इत्यादी महिलांनी या उपक्रमास विशेष सहकार्य केले इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्पचे अध्यक्ष अनिता नागोरी निना महाजन प्रीती नागोरी फाउंडेशनच्या जयश्री शेलार रोटरी क्लबचे संतोष जाधव त्यांचे सहकारी व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन झालेल्या बचत गटातील व वस्ती स्तर संघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ही रॅली यशस्वी करण्यासाठी कीर्ती साळुंखे गीतांजली यादव व आरती जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले