
स्थैर्य, फलटण, दि. २५ नोव्हेंबर : प्रभाग ८ मधील भाजप उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या प्रचाराला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आपले मुद्दे अगदी स्पष्टपणे आणि ठोसपणे मतदारांसमोर मांडले आहेत.
सिद्धाली शहा यांनी प्रचारात महिलांचे प्रश्न आणि त्यावर उपाययोजना, प्रभागातील समस्यांवर ठोस काम आणि सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी असलेल्या शासकीय योजना असे महत्त्वाचे विषय निवडले आहेत.
या ठोस मुद्द्यांना घेऊन त्या प्रचारात उतरल्या असल्याने त्यांची एक वेगळी छाप मतदारांवर पडत आहे. त्या केवळ आश्वासन देत नाहीत, तर सरकारी योजनांची माहिती देऊन लोकांना प्रत्यक्ष मदत कशी मिळेल, हे सांगत आहेत.
एकंदरीत, सिद्धाली शहा यांनी सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरण यावर भर दिला आहे. त्यांच्या या ठोस भूमिकेमुळे प्रभाग ८ मधील लढत लक्षवेधी ठरली आहे.

