
दैनिक स्थैर्य । 9 मार्च 2025। फलटण । जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील 131 ग्रामपंचायतीमध्ये महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट काम करणार्या महिलांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
ग्रामसभेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शासनाच्यावतीने कोणत्या योजना आहेत याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगटाच्या महिला यांनी सहकार्य केले.
तसेच पंचायत समितीमध्ये तालुकास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास निवडक सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होते. ‘हर घर जल‘ योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या 27 महिला सरपंच यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य येवले यांनी दैनंदिन काम करताना महिलांना येणार्या ताणतणावाचे कसे निवारण करावे याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे नियोजन महिला कर्मचारी श्रीमती अर्चना घोगरे, श्रीमती किर्दत, श्रीमती वाघमोडे, बचतगटाच्या प्रमुख संचना आटोळे यांनी केले होते.