
दैनिक स्थैर्य । 9 मे 2025। फलटण । झिरपवाडी ता. फलटण येथे द ब्रिलियंट हेल्थ अँण्ड अॅग्री संस्था अंतर्गत सखी महिला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आरी वर्क फॅशन डिझायनर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 40 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट डिझाईन्स आणि कलात्मक आरी वर्कमुळे स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली.
बारामती येथील फॅशन डिझायनर सुहानी पागळे यांनी परीक्षण केले. विजेत्यांना फलटण येथील पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्सच्यावतीने पैठणी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी चैताली पोपट गायकवाड, अनुजा पोपट गुंजवटे, वसुधा शामराव गुंजवटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळविला.
दरम्यान याच कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आलेल्या मोफत आरी वर्क प्रशिक्षण व शिलाई मशीन प्रशिक्षणाचा समारोपही करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
सरपंच सौ. वर्षा बोरकर यांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, होम मिनिस्टर कार्यक्रम, आणि आरी वर्क फॅशन डिझायनर हा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.