
दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । गोखळी । रांगोळी स्पर्धात सहभागी महिला व भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषेत सहभागी विद्यार्थिनींनीचे गट शिक्षणाधिकारी श्रीमती पठाण यांनी कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद प्रा. शाळा, साठे मिंडवस्ती, ता. फलटण येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा, शाळेतील विद्यार्थिनींनी भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या साकारलेल्या वेशभूषा व त्यांचे कार्य यांचे केलेले सादरीकरण, तसेच संगीत खुर्ची इ. कार्यक्रमाचे उदघाटन नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी श्रीमती पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी साठे गावच्या माजी सरपंच सौ. प्रतिभाताई मिंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सदस्या, गावातील महिला भगिनी उपस्थित होत्या
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये सौ. निवेदिता भुषण शिंदे प्रथम, सौ. स्विटी सुर्यकांत माने द्वितीय, सौ. निलम मिलन खांडेकर तृतीय यांनी तृतीय क्रमांक संपादन केले तर संगीत खुर्ची स्पर्धेत सौ. उषा विकास काकडे प्रथम, सौ. शकुंतला दुष्यंत खांडेकर द्वितीय, वर्षा सदाशिव खांडेकर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. विजयी स्पर्धकांचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती पठाण यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
प्रशाळेतील २४ विद्यार्थीनींनी भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साकारुन त्यांचे कार्य आपल्या वक्तृत्वातुन सादर केले. यामध्ये राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, रमामाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, बहिणाबाई चौधरी, लता मंगेशकर, सानिया मिर्झा, पी. टी. उषा, सुनिता विल्यम्स, मेरीकोम, कल्पना चावला, ललिता बाबर, कविता राऊत, रुपाली चव्हाण, किरण बेदी, बचिंद्र पाल, शीला डावरे, अरुनिमा सिन्हा आदी कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा विद्यार्थीनींनी सादर केली.
कार्यक्रमास मिंडवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालक महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. सुत्रसंचालन राजेश बोराटे व सौ. शकुंतला पवार यांनी केले. आभार उषा काकडे यांनी मानले.