निंबळक येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; ‘होम मिनिस्टर’मध्ये रंगल्या महिला, विजेत्यांना पैठणी अन् चांदीच्या वस्तूंची भेट


उद्योजक राम निंबाळकर आणि चंदुकाका सराफ (फलटण) यांच्या संयुक्त विद्यमाने निंबळक येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विजेत्या महिलांना पैठणी, चांदीची फ्रेम आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

स्थैर्य, निंबळक, दि. ९ मार्च : उद्योजक मा. श्री. राम निंबाळकर यांच्या संकल्पनेतून आणि चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा. लि. (फलटण) यांच्या संयुक्त विद्यमाने निंबळक परिसरातील महिलांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा शानदार सोहळा निंबळक ग्रामसचिवालय येथील उदयसिंह निंबाळकर सभागृहात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

कैलास भाऊजींनी रंगवला कार्यक्रम

या कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनींसाठी विविध मनोरंजनात्मक आणि स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध निवेदक कैलास भाऊजी बारामतीकर यांनी या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे खुमासदार सादरीकरण करत उपस्थित महिलांना हसवून आणि खेळवून खिळवून ठेवले.

विजेत्या महिलांचा पैठणी देऊन सन्मान

स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या महिलांना राम निंबाळकर यांच्यातर्फे पैठणी व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच, चंदुकाका सराफ यांच्यातर्फे पैठणी, चांदीची फ्रेम आणि फोर्मिंग ठुशी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.

या ठरल्या ‘होम मिनिस्टर’च्या मानकरी:

  • पैठणी विजेत्या: सौ. संपदा धीरज जोशी, सौ. विद्या विकास भोसले आणि सौ. शैला राहुल भोईटे.

  • विशेष बक्षिसे: सौ. साक्षी चारुदत्त शिंदे (चांदीची फ्रेम) आणि सौ. कोमल राहुल यादव (फोर्मिंग ठुशी).

  • आकर्षक भेटवस्तू विजेत्या: सौ. आरती अमित कुंभार, सौ. सारिका वैभव निंबाळकर, सौ. प्रिती अमोल शिंदे आणि सौ. किरण अमोल धुमाळ.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत, स्थानिक महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे निंबळक व परिसरातून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!