
दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। फलटण । येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
माजी विद्यार्थींनी सहाय्यक बांधकाम अधिकारी प्राजक्ता दत्तात्रय राऊत हिचा गौरव केला. यावेळी योगगुरू विद्या शिंदे यांनी योग साधना विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सौ. मयुरी किनगी यांनी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक केलेे.सौ. विजया शेंडे यांनी महिलांना आरोग्यासाठी मेडिटेशनचे महत्व सांगितले.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे व विज्ञानाच्या प्रयोगांचे प्रदर्शनही भरवण्यात आले. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन पटावर आधारित उत्कृष्ट नाटिका विद्यार्थ्यांनी सादर करण्यात आली. नारी शक्तीच्या सन्मानार्थ ‘नारीशक्ती जागर घे भरारी’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थींनी नृत्य सादर केले. लकी वुमन्स ड्रॉमधून उपस्थित महिलांमधून भाग्यवान महिलेस सन्मानित करण्यात आले.
व्हाईस चेअरमन सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. अर्चना एकळ यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सौ. माधुरी काशिद यांनी सूत्रसंचालन केले. सौ.अर्पिता बाबर यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य सौ. नूतन शिंदे , मा.श्री चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर देशमुख यांच्यासह महिला पालक उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.