
दैनिक स्थैर्य । 10 मार्च 2025 । कोळकी । फलटण येथील सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या आनंदवन प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन
उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी इयत्ता पाचवीतील मुलींनी विविध क्षेत्रातील थोर महिलांचे वेश परिधान करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महती आपल्या शब्दात मांडली.
या प्रसंगी मुलींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, अंतराळवीर सुनीता विल्यम्स,ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, नेमबाज मनू भाकर, संत संत मुक्ताबाई, धावपटू पी. टी. उषा, पहिल्या महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या व्यक्ती रेखा साकारत कार्याची माहिती दिली. तसेच महिलादिन विशेष कविता सादर केल्या.
रिद्धी राऊत हिने सूत्रसंचालन केले. माधुरी खलाटे, दीपाली धायगुडे, अहिवळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, शिक्षक, शिक्षत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.