
दैनिक स्थैर्य । 17 एप्रिल 2025। बारामती। सध्याच्या काळात सर्व क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानामुळे देशाची प्रगती वेगाने झाली आहे. महिलांचे योगदान म्हतपूर्ण असल्याचे प्रतिपादन बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी प्रतिपादन केले
मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी भाषणकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्याच्या समारोपप्रसंगी वैशाली पाटील बोलत होत्या
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे, कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे, विश्वस्त देवेंद्र शिर्के, दीपक बागल, पोपटराव वाबळे, जिजाऊ सेवा संघाच्या माजी अध्यक्ष विजया कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड प्रियंका काटे, शहराध्यक्ष अर्चना सातव, तालुकाध्यक्ष अॅड सुप्रिया बर्गे, उपाध्यक्ष ज्योती जाधव, अॅड वीणा फडतरे, उद्योजक सुधीर शिंदे, वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे सचिव विश्वास शेळके, प्रा. गोरख जगताप, वृषल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
वैशाली पाटील म्हणाल्या, महिलांनी संसार करताना मुलांचे संगोपन करीत विविध क्षेत्रातील वाचन करावे. वाचनांमुळे मुलांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण होते. विविध क्षेत्रातील कोणत्याही विषयात सहज बोलू शकाल. सध्याच्या काळात मत व्यक्त करण्यासाठी भाषणकला ही काळाची गरज असल्याचे यांनी सांगितले.
याप्रसंगी मनीषा शिंदे, कल्पना माने, सारिका मोरे, सुनंदा जगताप, भारती शेळके, पूजा खलाटे, मनीषा खेडेकर, विद्या निंबाळकर, विना यादव, वंदना जाधव, संगीता साळुंखे, गौरी साबळे-पाटील, यांनी भाषणकला प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात भारती शेळके, सारिका मोरे, पूजा खलाटे या प्रशिक्षणार्थींनी मोबाईल शाप की वरदान, जिजाऊ भवन चे कार्य, पोलिसांचे कार्य याविषयी माहिती सांगितली. सुनंदा जगताप यांनी इंग्रजीतील भाषण कलेचे महत्व सांगितले.
जिजाऊ सेवा संघाच्या उपाध्यक्ष मनीषा शिंदे, गृहिणींना हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. विचार व्यक्त करावेत यासाठी भाषण कला महत्त्वाचे आहे.
भाषणकला प्रशिक्षक अनिल साबळे- पाटील यांनी भाषणकला तंत्र व मंत्रचे महत्व सांगितले. कल्पना माने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. विना यादव यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा खेडेकर यांनी आभार मानले