स्थैर्य, सातारा, दि. 24 : एका शरीरविक्रेय महिलेस तिला तिची लैंगिक संबंधांची क्लिप व्हायरल करण्याची धमकी हवालदाराचे नाव घेवून देत तिला 25 हजार रुपयांच्या मागणी करणाऱ्या ओयास खान उर्फ सोन्या रा. लकडी पुलाजवळ, शनिवार पेठ, सातारा याच्यावर तोतयागिरी करुन फसवणूक केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत पिडीत 35 वर्षीय महिलेने तक्रार दिली असून संशयित आरोपी ओयास खान याने त्याच्या मोबाईलवरुन त्या महिलेला ’मी हवालदार शिंदे बोलतोय’ असे नाव सांगितले. यावेळी त्याने या महिलेला तुझी एक लैंगिक संबंधांची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. तू मला 25 हजार रुपये मी सांगेन त्या ठिकाणी आणून दे अन्यथा ती क्लिप मी व्हायरल करुन तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली. दि. 28 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर महिलेने त्याकडे दुर्लक्ष केल्यावर संशयिताने तिची क्लिप व्हायरल केली असल्याने मग महिलेने पोलिसांकडे धाव घेतली व तक्रार दाखल केली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर सातारा तालुका पोलिसांनी संशयित आरोपी खानवर खंडणी, फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ाची गंभीर दखल घेत पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत.