दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२३ | फलटण |
ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जात असला तरी महिला शेतीला पूरक असे व्यवसाय करीत असतात. या पूरक व्यवसायांबरोबरच बचतगटाच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग सुरू करावेत तरच आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सासवड, तालुका फलटण येथील महात्मा फुले विचारमंच व श्रीमंत विश्वजीतराजे युवा मंचच्या वतीने शिवजयंती निमित्ताने महिला बचतगट उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीमंत विश्वजितराजे बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव रासकर, अमोल रासकर, नंदकुमार झणझणे, चैतन्य संस्थेच्या रासकर मॅडम आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे श्रीमंत विश्वजीतराजे म्हणाले की, शहरी भागातील लोकांच्या मागणीचा अभ्यास करून त्यानुसार महिलांना कोणता व्यवसाय करता येईल याबाबत एक भविष्यात व्यापक महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यातून व्यवसाय धंद्याला येणार्या समस्या यावर तोडगा काढणार असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या महिला मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल रासकर, नंदकुमार झणझणे व त्यांच्या सर्व सहकार्यांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा संसाधन व्यक्ती सौ. सावंत मॅडम व चैतन्य संस्थेच्या रासकर मॅडम महिला व युवकांसाठी विविध उद्योगांविषयी माहिती व शासकीय योजनांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले व महिलांना उद्योग सुरू करताना येणार्या सर्व अडचणींवर सहकार्य करू, असा विश्वास दिला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री. शिवाजी रासकर, माजी सरपंच सौ. संगीता जाधव, ग्रामपंचायत सदस्य सौ. नंदा कुंभार, व्हा. चेअरमन श्री. विठ्ठल भुजबळ, माजी व्हा. चेअरमन मधुकर भुजबळ, कृषी विभागाचे नेवसे साहेब, यादव साहेब, श्री. गौतम काकडे, माजी नायब तहसीलदार महादेव तावरे, सतीश झणझणे, अमोल अनपट, रुपेश भुजबळ, विलास भुजबळ, सूरज जाधव, केतन जाधव, चेतन जाधव, सचिन रासकर, नितीन धायगुडे, रोहित भुजबळ, आदेश भुजबळ, सचिन जाधव, निलेश भुजबळ, समीर रासकर, महिला बचतगटांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व बहुसंख्य महिला सदस्य व विश्वजितराजे युवा मंचचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचलन श्री. अनिल भुजबळ यांनी केले तर स्वागत अमोल रासकर यांनी केले. आभार नंदकुमार झणझणे यांनी मानले.