काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवर भाजल्या भाकरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । महागाईमुळे देशातील जनता त्रस्त असताना केंद्र सरकारला जनतेचे सोयरसुतक नाही. जीवनावश्यक वस्तूंवर देखील आता जीएसटीच्या माध्यमातून कर लादला जात असल्याने मोदी सरकारच्या निषेर्धात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून निषेध केला.

देशातील जनतेचे कंबरडे आधीच महागाईने मोडले आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गगनाला भिडले असून आता सरकारने खाण्याच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावला आहे. विशेषतः या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील जीएसटी द्यावा लागणार आहे. उपचारावर जीएसटी लावण्याचे पाप केंद्र सरकारने केले असून जनता आता त्रस्त झाली आहे. या सरकारला महागाईचे सोयरसुतक नसून सरकारमधील काही मंत्री महागाई वाढत असेल तर खाणे पिणे बंद करा, असे संताप जनक वाक्य वापरून जनतेच्या भावनांचा खेळ करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलकर्त्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांनी व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पनाताई यादव, भानुदास माळी, नरेश देसाई, अरबाज शेख, मनोज तपासे, धनश्री महाडिक, मालन परळकर आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!