दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । सातारा । प्रभाग क्रमांक 19 चे माजी नगरसेवक रवींद्र भैय्या ढोणे यांच्यावर ॲट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी करून खोटी तक्रार देणार्यांवर कठोर कारवाई करावी अशी एक मुखी मागणी मंगळवार पेठेतील महिलांनी प्रसारमाध्यमांसमोर केली या प्रकरणात न्याय न मिळाल्यास येत्या आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वार्ड क्रमांक 19 मध्ये गटाराच्या कामावरून उद्भवलेल्या वादात व प्रभागाचे माजी नगरसेवक व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे खंदे समर्थक रवींद्र ढोणे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता . या गुन्ह्याच्या विरोधात मंगळवार पेठेतील महिलांनी आक्रमक होत येथील मनामती चौकात आपल्या तीव्र भावना व्यक्त करत रस्ता रोखून धरला . रवींद्र ढोणे यांच्यावर आकस बुद्धीने ॲट्रॉसिटी चे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 11 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली त्यावेळी रवींद्र होणे हे प्रभागात उपस्थित नव्हते याचे सीसीटीव्ही फुटेज व इतर माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहे ,असे असताना केवळ सूडबुद्धीने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहेत हे आम्ही अजिबात चालून देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
जवळपास पन्नास ते साठ महिलांनी गुरुवारी सकाळी मना मती चौकात या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात जोरदार धरणे आंदोलन केले आणि ढोणे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्यावेत अशी मागणी केली . 11 फेब्रुवारी रोजी संभाजी वायदंडे यांनी स्वखर्चाने गटाराचे काम सुरू केले होते मात्र येथील विक्रांत दुबळे व गणेश दुबळे यांनी संबंधितांना ही तक्रार करण्यास भाग पाडले अशा दोषी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि खोटे ॲट्रॉसिटी चे गुन्हे रद्द करण्यात यावेत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करून आत्मदहन करण्यात येईल असा इशारा महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला या महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासन प्रशासनाच्या प्रभारी जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांना निवेदन सादर केले.