शनीनगर फलटण येथे नागपंचमी सणानिमित्त महिलांचा जल्लोष


दैनिक स्थैर्य । दि. 1 ऑगस्ट 2025 । फलटण । फलटण तालुक्यात व शहरात महिलांनी आज नागपंचमीचा सण पारंपरिक उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला. फलटण येथील शनिनगर बागेमध्ये महिलांसाठी शनिनगर नागपंचमी उत्सव मंडळ व योद्धा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी शहराच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करीत महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी सातारा जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नागोबा देवाची आरती करण्यात आली.

यावेळी दिपक कर्वे, संतोष कर्वे, चंदन कर्वे सर, विकास कर्वे, रोहित कर्वे, अमित कर्वे, निलेश गायकवाड, राजू काशीद, यश घाडगे, बंडू कर्वे, विकी कर्वे इत्यादी नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

त्यानंतर श्रीमंत सौ.शिवांजलीराजे यांच्या शुभहस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले व विजेत्या महिला स्पर्धकांना पैठणी व पी.एन.गाडगीळ अँड सन्स यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.निताताई नेवसे, फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. वैशालीताई चोरमले, सौ. सुवर्णाताई खानविलकर, सौ. दिपालीताई निंबाळकर, श्रीमती रंजनाताई कुंभार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ.प्रगतीताई कापसे व माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. तर मान्यवरांचा सत्कार सौ.राणी बाचकर, पल्लवी धायगुडे, सारिका भोसले, कोमल काटकर व पुनम कदम यांनी केला.

या कार्यक्रमांमध्ये महिलांनी पारंपरिक गाणी, फुगड्या, आणि झिम्मा हे पारंपारिक खेळ खेळत नागपंचमी सणाचा मनमुरादपणे आनंद लुटून हा उत्सव जल्लोषात साजरा केला.

पारंपरिक खेळानंतर या ठिकाणी लावण्यात आलेल्या डि.जे.च्या तालावर महिलांनी एकच ठेका धरला होता. यावेळी अनेक महिलांची संवाद साधला असतात त्या म्हणाल्या की नागपंचमी हा सण आमच्यासाठी श्रद्धेचा आणि सांस्कृतिक एकतेचा प्रतीक आहे. या दिवशी आम्ही महिलांच्या एकत्र येण्याचा आणि एकमेकांशी संवाद साधण्याचा एक आनंदाचा क्षण अनुभवतो असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब चोरमले यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार गाढवे, वैभव जानकर, जित पवार, निलेश शिंदे, विकी कर्वे, अवधुत कदम, गणेश धायगुडे, मयुर हिरणवळे, शेखर रेळेकर, शुभम देशमाने, नीलेश शिंदे, सोन्या केंजळे, ओंकार दळवी, संतोष कर्वे, दिनेश कर्वे, प्रथमेश आंबेकर, सचिन नाईक, यश धायगुडे, अमन शेख, राज धायगुडे, श्रेयस कदम, सागर पालकर, गणेश बाबर, रोहन जगताप, सिद्धेश सावंत, यश कदम, केदार साळुंखे, नन्या लंभाते, सोन्या लंभाते, आकाश कल्याणकर, पप्पू कोरे, दत्ता नाईक, रोहन माळवे, आकाश शिंदे, प्रणव चमचे, भूषण कापसे, आदित्य शिंदे, दुर्गेश शिंदे, अभिषेक निंबाळकर, सनी आंबेकर, अजय शिंदे, आनंद भोसले, दक्ष भाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!