कृष्णा नदीत आढळला महिलेचा मृतदेह


दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । सातारा । कराड तालुक्यातील उंब्रज येथील कृष्णा नदी पात्रात शेतीसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कुंभारडोह परिसरात एका ५५ ते ६० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही घटना बुधवार (दि. १२) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने अधिक तपशील समजू शकला नाही.


Back to top button
Don`t copy text!