दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
आसू, ता. फलटण येथे दि. १० फेब्रुवारी रोजी उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गावातील एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजता फिर्यादी महिला उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी गावातीलच रवींद्र बाळासो गोडसे याच्याकडे गेली असता आरोपीने मला दिलेले उसने पैसे परत देण्यासाठी त्याची घरी बोलावून ‘तू येते कशाला आलीस’ असे म्हणून माझा उजवा हात धरून मला खाली पाडले व माझा ब्लाउज फाडून त्याचे बटन तोडले. माझे मनाला लज्जा उत्पन्न केली व मी उठण्याचा प्रयत्न केला असता माझ्या केसांना धरून ओढले. त्यावेळी आमचे भांडणे सोडवण्यास माझा मुलगा अक्षय आला असता त्यालाही सदर आरोपीने काठीने मारले व त्याच्या शर्टची बटणे तोडली. त्याच्या पोटात लाथा मारल्या, माझ्या मुलास व मला शिवीगाळ करून पुन्हा येथे आला तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी रवींद्र बाळासोा गोडसे (रा. आसू, ता. फलटण) यास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सूर्यवंशी करत आहेत.