दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
आंदरूड, तालुका फलटण गावच्या हद्दीत विवाहीत महिलेच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी सुधीर अण्णा नलावडे (राहणार नलवडे वस्ती, कुरवली बुद्रुक, तालुका फलटण, जिल्हा सातारा) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आंदरूड येथे सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला तुळशीला पाणी घालत असताना आरोपी हा दारू पिऊन तेथे गेला व तिचा उजवा हात धरून तिच्या घराच्या पाठीमागे असलेल्या गाईच्या गोठ्यात घेऊन गेला व तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करून तिला मिठी मारली व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी महिलेने आरडाओरडा केला. त्यावेळी दूध घालण्यासाठी गेलेले तिचे पती व मुलगा असे दोघे तेथे आले. त्यावेळी आरोपी हा महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळून गेला, अशी तक्रार फिर्यादी महिलेने पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुधीर अण्णा नलावडे (राहणार नलवडे वस्ती, कुरवली बुद्रुक) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पो.हवा. कर्णे अधिक तपास करत आहेत.