
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील एका महिलेचा दारूच्या नशेत हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने मंगलमूर्ती हॉटेलच्या मालकाविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवारी ११ वाजण्याच्या सुमारास मंगलमूर्ती हॉटेलचे मालक संशयित शाहूराज सयांजी पाटील हे दारूच्या हे नशेत होते. त्यांनी महिलेचा हात धरून तिला ओढले. आणि तुझी नणंद व सासु येथे वेश्या व्यवसाय करतात. तुझ्या घरात आता कोणीही नाही. तर तु माझ्याकडे एक रात्र झोपायला ये असे म्हणत महिलेला लज्जा उत्पन्न होईल .असे वर्तन केले. तसेच नणंद हिला शिवीगाळ करत तुम्ही आज सुटला तुम्हाला उद्या दाखवतो अशी धमकी दिली. यामुळे महिलेने संशयित शाहूराज पाटील याच्या विरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तोरड करत आहेत.