वाखरी येथे महिलेचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२३ | फलटण |
वाखरी (ता. फलटण) येथे तिघाजणांनी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी संतोष दादा ढेकळे, संदीप नागु ढेकळे व सचिन नागु ढेकळे (सर्व राहणार वाखरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० मे २०२३ रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास वाखरी येथे फिर्यादी महिलेच्या घरासमोर उभे राहून वरील आरोपींनी आवाज दिल्यानंतर फिर्यादी महिला या घरातून बाहेर आल्या. त्यावेळी आरोपी त्यांना म्हणाले की, तुझा नवरा दत्तात्रय व मुलगा केतन कोठे आहे? त्यावेळी फिर्यादी यांनी सांगितले की, ते बाहेर गेले आहेत, तुम्हा सर्वांना लय मस्ती आलिया, असे म्हणून शिवीगाळ केली व यातील संतोष ढेकळे व सचिन ढेकळे या दोघांनी फिर्यादीचा साडीचा पदर ओढला व संदीप ढेकळे याने फिर्यादीचा ब्लाऊज हाताने धरून ओढल्याने तो फाटला. त्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

या प्रकरणी अधिक तपास शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!