दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गावर लोणंद बाजुकडे उघड्यावर प्रातकविधीकरता जाताना अज्ञात वाहनाने वृध्द महिलेला जोराची धडक दिल्याने महिला जागेवरच ठार झालेली आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, चंचलाबाई बाबुराव कदम, वय ८०, रा. सगुणामातानगर, मलठण ही वृध्द महिला सकाळी सकाळी ७ वाजण्याच्या पुर्वी पालखी महामार्गावर लोणंद बाजुकडे प्रातकविधीसाठी जात असताना अवजड मोठ्या वाहन चालकाने वृध्द महिलेला धडक देवुन जागीच ठार केलेले आहे. याबाबतची फिर्याद अमित बाळासो कदम, वय ३२, रा. सगुणामाता नगर, मलठण, फलटण यांनी दिली असुन फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक भारत किंद्रे पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करित आहेत.