चारचाकीने ठोकरल्याने महिला ठार


दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२१ | वडूज | वडूज-कराड रस्त्यावर कुरोली फाट्यानजीक चारचाकी गाडीने ठोकरल्याने गुरसाळे (ता. खटाव) येथील महिला ठार झाली. हातिमा राजुभाई शिकलगार(वय:55)असे अफघातात ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. मयत हातिमा या आपले दीर मौलाभाई रसूल शिकलगार यांच्या दुचाकी गाडीवर बसून वडूज येथे दवाखान्यात औषधउपचार करण्यासाठी येत होत्या. कुरोली फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येणार्‍या रवीशंकर हरिश्चंद्र गौड(वय:28) याच्या चारचाकी गाडीने जोरदार धक्का दिला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हातिमा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू पावल्या. त्यांच्या पार्थिवाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर गुरसाळे येथे मुस्लिम धर्मानुसार शोकाकूल वातवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, दीर असा परिवार आहे. या अपघातप्रकरणी गौड याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि मालोजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम ओंबासे अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!