
दैनिक स्थैर्य । 1 जून 2025। सातारा । सातारा जिल्हा रुग्णालयात करोनाचे उपचार घेत असणार्या 70 वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले.
सातार्यात अडीच वर्षानंतर करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एक महिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. करोनाग्रस्त झाल्यानंतर स्तरावर या महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर येथील रुग्णालयातील करोना वार्ड मध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारात असताना आज त्यांचा मृत्यू झाला. या महिला रहिमतपूर येथील होत्या.

