स्थैर्य, फलटण : आरटीओची नोकरी लावतो असे सांगून वेळोवेळी पैसे घेवुन फिर्यादी व तिच्या वडीलांची फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. याबाबतची शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, प्रमोद हरीचंद्र रनवरे, रा. मलटन, ता. फलटण याने योगिता शिवाजी गुंजवटे, वय 35, रा. झिरपवाडी, ता. फलटण यांना दिनांक 28.2.2009 ते दिनांक 16.7.2020 रोजी पर्यंत झिरपवाडी ता फलटण येथे आर.टी.ओ. महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी लावतो असे नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून वेळोवेळी 1,25,00,000/- रुपये रोख स्वरूपात तसेच नोकरी लागल्याचे खोटी पत्रे पाटवून ती खरी असल्याची सांगून फसवणूक केली असल्याची फिर्याद योगिता गुंजवटे यांनी दिली आहे. सदर प्रकरणी प्रमोद रनवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास ए.पी.आय. राऊळ हे करीत आहेत.