दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । फलटण । दि.-२२ जेष्ठ गणित तज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनानिमित्त आपल्या सर्वांना शालेय जीवनात अवघड वाटणाऱ्या गणित या विषयाची गोडी निर्माण झाली पाहिजे. याचे औचित्य साधून मा. प्राचार्य रवींद्र येवले सर यांचे मार्गदर्शन /व्याख्यान आयोजन करण्यात आले येवले सर म्हणाले ,”की विद्यार्थ्यांनी गणित हा विषय खूप आवडीने शिकला पाहिजे. तसेच दैनंदिन जीवनात गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच बरोबर 0 ते 9 या अंकाचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांना गणित या विषयाच्या अभ्यासात प्रश्न पडलेच पाहिजेत याशिवाय विद्यार्थ्यांना या क्षेत्रात गोडी निर्माण होणार नाही सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गणिताच्या पायऱ्या शिकवून गुण मिळवायला शिकवतात मात्र एखादी पायरी चुकली तर त्याचे गुण आणि विषयावरील मन उडते असे विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे गणित विचार करायला शिकवतात त्याच पद्धतीने ते शिकवले पाहिजे तसे झाले तर मुलांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देणे सुलभ जाते. तसेच कौशल्य विकसित होण्यासाठी गणित विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यांना हसत-खेळत संवाद साधत गणितीय संकल्पना चा परिचय करून दिला. तसेच गणित
विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर त्यांनी गणिततज्ञ रामानुजन त्यांच्या जीवनावर आधारित “दुर्दैवी प्रतिभावंत” हे पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात भेट दिले.
कार्यक्रमाला उपस्थित संस्थेच्या संचालिका सौ. संध्याताई गायकवाड मुख्याध्यापिका सौ. सुमन मकवाना समन्वयका सौ.अहिल्या कवितके तसेच पर्यवेक्षक अमित सस्ते त्याच बरोबर सर्व शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते..