मोसमी पावसाची उत्तर भारतातून माघार


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२८: यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला असून दोन दिवसात तो उत्तर प्रदेशातून माघारी जाईल, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. अखेरच्या टप्प्यात मोसमी पावसाने सरासरी ओलांडली आहे. २६ सप्टेंबपर्यंत देशात सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक पाऊस झाला असून राजस्थानातून मोसमी पाऊस माघारीस अनुकूल स्थिती आहे.

स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, आता पाऊस कमी होत चालला आहे. पश्चिम राजस्थानातून उद्यापासून त्याची माघार सुरू होईल. ९६ ते १०४ टक्के पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या अधिक असतो. अवक्षेप पातळी १०४ ते ११० टक्के ही जास्त मानली जाते. नऊ राज्यात अतिरिक्त पाऊस झाला असून वीस राज्यात नेहमीप्रमाणे सरासरीइतका पाऊस झाला आहे. १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान भारतात पावसाचा मोसम असतो. १ जूनला मोसमी पाऊस केरळात आला होता. जूनमध्ये १७ टक्के अधिक पाऊस तर जुलैत १० टक्के कमी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये २७ टक्के अधिक पाऊस झाला. उत्तर भारतातील दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर या भागांत कमी पाऊस झाला आहे. लडाखमध्ये खूपच कमी पाऊस झाला. दक्षिण भारतात गुजरात, गोवा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक येथे जास्त, तर सिक्कीममध्ये खूपच अधिक पाऊस झाला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!