स्थैर्य, पाटण, दि. 22 : कोरोना साथीने जगभरात थैमान घातले आहे. यामुळे सारा देश हैरान झाला आहे. मार्च महिन्यापासून राज्यात या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागा बरोबर राज्याचा एकात्मिक बालविकास प्रकल्प शर्थीचे प्रयत्न करत आहेत.कोविड-19 च्या सर्वेक्षणाचे काम करणा-या अंगणवाडी सेविका या साथीत बाधित सापडत असून राज्यात अनेक ठिकाणी यामुळे अंगणवाडीच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने अंगणवाडी च्या सेविकाना सर्वेक्षणाचे काम देण्यात येवू नसल्याचे लेखी पत्र एकात्मिक बालविकास प्रक्ल्पाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देवुन या मोहिमेतून माघार घेतली आहे.
कोविड-19 या महामारीने महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून हातपाय पसरायला सुरवात केली आहे. गेली पाच महिने राज्य लॉक डाउन मध्ये लॉक आहे. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. आरोग्य विभागाच्या साथीला अंगणवाडी च्या सेविकांना सर्वेक्षणाचे काम दिले आहे.शहरी व ग्रामिण भागात सर्वेक्षणाचे उत्तमरीत्या काम करण्याची जबाबदारी सेविकांनी पार पाडली आहे.कोविड-19 सर्वेक्षणाच्या कामकाजामुळे अंगणवाडीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.त्यामुळे ग्रोथ मॉंनिटरिंग व कुपोषणाचे कामकाज ठप्प झाले आहे.
अंगणवाडी सेविका या 0 ते 6 या वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता यासाठी काम करत असतात त्यांना कोविड-19 सर्वेक्षणाचे काम दिल्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका कोरोना बाधित होण्याची शक्यता असून त्याचा थेट सबंध 0 ते 6 वयोगटातील बालके गरोदर माता स्तनदा माता यांच्याशी येत असल्याने हे घटक सुध्दा बाधित येण्याची शक्यता असल्याची भीती एकात्मिक बालविकास प्रक्ल्पाने व्यक्त करून कोविड-19 च्या सर्वेक्षणाचे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले काम देण्यात येवू नये. असे पत्रात नमुद केले आहे.फक़त अंगणवाडी कार्यक्षेत्रातील 0 ते 6 वयोगटातील बालके गरोदर माता स्तनदा माता याचे सर्वेक्षणाचे काम देण्यात यावे अशी सूचना केली आहे.