दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२२ । फलटण । मौजे वडले ता.फलटण येथील सिद्धार्थनगर वस्तीवरील मागील सहा वर्षापूर्वी सिंगल फेज २५ केव्ही डीपी (distribution Panel) काढून नेण्यात आला होता.यासंबंधी ग्रामस्थांनी वारंवार लेखी व तोंडी अर्ज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण विभागात केली होती. परंतु याची कोणीही दखल घेतली नाही.परंतु याविषयी गावाचे सामाजिक कार्यकर्ते रणजित सोनवलकर यांनी याबाबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आणि झाला प्रकार त्यांच्या लक्षात आणून देण्यात आला.यावर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण विभागातील मुख्य अभियंता व उप अभियंता यांच्याशी चर्चा करून तातडीने २५ केव्ही चा डीपी (distribution Panel) वाढवून ६३ केव्ही चा डीपी बसविण्याची सूचना वजा आदेश निर्गमित केला.त्यानुसार गेली सहा वर्षांपासून रखडलेला मौजे वडले ता.फलटण येथील सिद्धार्थनगर वस्तीवरील डीपीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला.
त्यामुळे सिद्धार्थनगर वस्तीवरील सर्वच ग्रामस्थांनी श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर यांचे विशेष आभार मानले.यावेळी वेळी माजी चेअरमन सिताराम सोनवलकर, माजी सरपंच सतीश काळे, संचालक प्रा.डॉ संतोष लाळगे,सामाजिक कार्यकर्ते रणजित सोनवलकर, शामराव सोनवलकर, माजी चेअरमन दादासाहेब सोनवलकर, चेअरमन मल्हारी सोनवलकर,सामाजिक कार्यकर्ते तानाजी मोरे, समीर मोरे, सोमनाथ भोसले, गोरख मोरे, कुंडलिक मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी सोनवलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दादा खवळे, विश्वास नलवडे, रामचंद्र मोरे, महेश भोसले, बापूराव मोरे, शिवाजी शेंडगे, अर्जुन सोनवलकर, संतोष मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.