
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज 31 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्यावतीने “राष्ट्रीय एकता दौड” चे आयोजन करण्यात आले. सकाळी 8.30 वा. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल ते पोवई नाका या मार्गावर एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कारार्थी आदित्य अहिरे यांनी हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडचा प्रारंभ केला. खेळाडूंना एकात्मता राखण्याची शपथ देण्यात आली. या दौडमध्ये विविध संस्था, ॲकॅडमी यांचे एकूण 270 खेळाडू व पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक भानुदास यादव, क्रीड अधिकारी मोहन पवार, अंकुश जांभळे, विश्वास मोरे, दया शितोळे, संतोष क्षीरसागर, भंडलकर आदी उपस्थित होते.