जुन्या भांडणाच्या रागातून एकावर कोयत्याने वार


दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । सातारा । जुन्या भांडणाच्या रागातून एकाने फिर्यादीवर कोयत्याने वार केल्याची घटना दि. 29 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. या हल्ल्यामध्ये संतोष पवार हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू वैराग, अजय बागल, रवी, प्रथमेश पवार यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. फिर्यादी संतोष पवार आणि त्याचा मित्र युवराज भोसले हे आकाशवाणी झोपडपट्टी येथून जात होते. त्यावेळी संबंधित संशयितांचे आणि फिर्यादीची जुन्या भांडणाच्या कारणावरून बाचाबाची झाली होती. याचा जाब विचारण्याच्या रागातून राजू वैराट यांनी पवार यांच्या दंडावर कोयत्याने वार केला व व इतर ठिकाणी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली पोलीस हवालदार इस्ते तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!