वाढे फाटा येथे एकावर कोयत्याने वार


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । सातारा । वाढे (ता.सातारा)येथे राहणाऱ्या दत्तात्रय शशिकांत पवार यांच्‍यावर रात्रीच्‍या सुमारास अज्ञाताने कोयत्‍याने वार केले. कोयता लागून जखमी झालेल्‍या पवार यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार अज्ञातावर सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

वाढे येथील मंगलमुर्ती हॉटेल जवळ दत्तात्रय पवार हे राहण्‍यास आहेत. ता. २९ रोजी रात्री ते कुटुंबियांसमवेत घरात होते. याचवेळी त्‍यांच्‍या घरासमोर एक व्‍यक्‍ती आला. त्‍याने पवार यांच्‍याकडे विचारपुस करण्‍यास सुरुवात केली. पवार यांनी त्‍या व्‍यक्‍तीस काही माहित नसल्‍याचे सांगत घराच्‍या आवारातून बाहेर काढण्‍यास सुरुवात केली. व्‍यक्‍तीस बाहेर काढल्‍यानंतर घरासमोरील गेट बंद करत असतानाच त्‍या अज्ञात व्‍यक्‍तीने हातात असणारा कोयत्‍याने पवार यांच्‍यावर वार करण्‍यास सुरुवात केली. हल्‍ला होत असल्‍याने पवार सावध झाले व त्‍यांनी हल्‍लेखोराच्‍या हातातील कोयता हिसकावून घेतला.

हातातील कोयता पवार यांनी घेतल्‍याने त्‍या हल्‍लेखोराने पळ काढला. दोन्‍ही हातावर कोयत्‍नाने वार झाल्‍याने पवार हे जखमी झाले होते. उपचार घेतल्‍यानंतर पवार यांनी आज याची फिर्याद सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात नोंदवली.


Back to top button
Don`t copy text!