विप्रोचे कोविड हॉस्पिटल दि.3 पासून सेवेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, पुणे, दि. 01 : जिल्ह्याच्या 13 तालुक्‍यांत 33 कोविड केअर सेंटर (सीसीसी) असून उपलब्ध खाटांची संख्या 3 हजार 880 इतकी आहे. कोविड रुग्णालये 21 असून उपलब्ध खाटांची संख्या 1 हजार 181 इतकी आहे. तर भविष्यात 18 कोविड केअर सेंटर आणि 4 हजार 682 खाटा, 28 कोविड रुग्णालये आणि 1 हजार 830 खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

विप्रो हिंजवडी हॉस्पिटल येथे 450 खाटांचे नियोजन आहे. हे हॉस्पिटल 3 जूनपासून कार्यरत होईल, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मर्सिडीज म्हाळुंगे इंगळे हॉस्पिटलमध्ये 1 हजार 408 खाटा असून सध्या 40 रुग्ण दाखल आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष (स्पेशल कंट्रोल रुम) स्थापन करण्यात आला आहे. त्याचा टोल फ्री क्रमांक 1800-233-4130 असा असून एकूण 15 लाइन्स उपलब्ध आहेत. यावर आतापर्यंत 23 हजार 830 नागरिकांनी कॉल करुन माहिती घेतली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!