“सावळ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर संपन्न”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । बारामती । विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्र ज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सावळ, येथे दिनांक 6 ते 12 जानेवारी या दरम्यान संपन्न झाले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल गुजर, व सावळ च्या सरपंच सौ. सारिका धनंजय आटोळे, धनंजय आटोळे, फक्कड बालगुडे, दीपक आवाळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुमन देवरुमठ उपस्तीत होते.

हिवाळी शिबिराची सुरुवात सावळ गावामध्ये रॅली काढून परिसर स्वच्छता, पाण्याचे महत्व, वृक्ष लागवड, प्लास्टिक मुक्त, गाव ओला कचरा सुका कचरा वेगळा करने, ऊर्जा बचत बाबत, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत वेगवेगळे बॅनर बनवून गावातील लोकांना जनजागृती केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावातील हनुमान मंदिर परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, स्वच्छता व वृक्ष लागवड, श्री खंडोबा मंदिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, स्मशान भूमी परिसर व त्या ठिकाणी वृक्ष लागवड अशा विविध प्रकारची कामे केली. या शिबिरात विविध विषयातील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन लागले. त्यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी युवकांचा ध्यास ग्राम विकास या विषयावर मार्गदर्शन केले. गणेश जाधव तालुका कृषी सहाय्यक अधिकारी यांनी नोकरदार नको नोकरी देणारे मालक बना असा संदेश दिला तसेच शेतीतील विविध योजना याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. तसेच अल्पेश वाघ के व्ही के बारामती यांनी मधमाशी पालन व त्याचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन गावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना केले. प्रा. डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे तसेच ग्रामविकासात युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे प्रा. उदय पाटील यांनी शेकोटीचा कार्यक्रम घेतला त्यामधून विद्यार्थ्यांचे व गावातील ग्रामस्थांचे मनोरंजन केले. त्याचप्रमाणे डॉ. महावीरसिंग चव्हाण संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व आजचा विद्यार्थी याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी जय जय महाराष्ट्र माझा, आई वरील कविता तसेच तानाजी मालुसरे यांच्या वरील पोवाडा गाऊन ग्रामस्थांचे मनोरंजन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांनी पटनाट्याच्या माध्यमातून व्यसनाधीन माणसाची कथा समजावून सांगितली . या शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. सुमन देवरुमठ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आणि डॉ अनंत शेरखाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी काम पाहिले. तसेच हे शिबिर यशस्वी होण्यासाठीसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!