स्थैर्य, फलटण, दि.९: जगभरात नावाजलेल्या व भारतात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकलूज येथील फ्रटेली वाईनच्या नवीन वाईनचा प्रारंभ फ्रेटली चे प्रमूख अर्जूनसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते लॉन्चींग करुन झाला. सदर वाईन हे ” टिल्ट ” या नावाने असून ही चार प्रकारची वाईन आजपासून बाजारपेठेत दाखल झाली आहे.
या वेळी माहीती देताना अर्जूनसिंह मोहिते पाटील म्हणाले, सन २००६ साली दिल्लीचे कपिल सेक्री, इटलीचे आन्र्दे व आॕल्यू सेची, आ. रणजितसिंह मोहिते पाटील व अर्जूनसिंह मोहिते पाटील या तीन परिवारातील बंधूनी एकञ येऊन सन २०१० पासून फ्रेटली वाईन हा द्राक्ष प्रक्रिया उद्योग सुरु केला. सुरवातीला केवळ तीन ब्रांड बाजारपेठेत आणले. आज फ्रेटलीचे ३७ वेगवेगळे ब्रांड बाजारात आहेत. सन २०१० ते सन २०२० या दहा वर्षाच्या कालावधीत सदरचा उद्योग हा देशात दुसर्या क्रमांकावर आहे. या उत्पादनासाठी परिसरात २४० एकरात द्राक्ष उत्पादन केले जाते. या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या १२ द्राक्ष जाती उपलब्ध केल्या आहेत. याची रोपे फ्रान्स मधून मागवली आहेत. पुर्वी सदरची वाईन ही बाटलीत होती. ती टीन मध्ये आणावी असा अभ्यास मागील दोन वर्षा पासून आम्ही करीत होतो. त्या नूसार एकाच वेळी चार प्रकारची वाईन आम्ही तयार केली आहे. या मध्ये दोन प्रकार कार्बोनेटेङ आहेत. व्हाईट टिल्ट रेड, टिल्ट बबली, टिल्ट रोझी, टिल्ट रोझेस बबली या नावाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. सदरचा टीन २५० मि.ली.चा असून यामध्ये परिसरातील शेतकर्यांचीही द्राक्षे वापरली आहेत. याची किंमत १६० रु ते १८० रु. एवढी आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. फ्रटेलीमुळे परिसरातील १०० महिलां व कंपनीमध्ये १०० युवकाना रोजगाराची संधी मिळाली आहे. याशिवाय २०० एकरावरच्या उत्पादनाचे कान्ट्रक्ट केले असून शेतकऱ्यांची द्राक्षे हमीभावाने खरेदी केली जातात. कोरोना काळात त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला असून आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या दूरदृष्टी मुळे ग्रामीण भागाचे शेती उत्पादनात परिवर्तन करुन ग्रामीण शेतकऱ्यांना उत्पनाचे व रोजगाराचे साधन निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.
वाईन मेकर विशाल केदारी म्हणाले, यातील व्हाईट वाईन मध्ये व्हिटमीन सी असते, तर रेड वाईन शरिरातील रक्तभिसरण क्रीया चांगली ठेवते. त्यामुळे हृदयविकारासारखे आजार टाळता येतात. यात केवळ ११ टक्के अल्कोहोल आहे. या वेळी त्यांनी परदेशातील वाईन व भारतीय वाईन मधील फरक स्पष्ट केला.
विक्री व्यवस्थापक राजीव पुरोहित म्हणाले, सदरच्या वाईनला लंडन येथे सुवर्णपदक प्राप्त झाले असून सध्या ही वाईन अमेरीका, जपान, होन्कोंग, डेन्मार्क येथे जाते. याचे महाराष्ट्रात अकलूज, इंदापूर, उस्मानाबाद, विजापूर येथे प्लांट आहेत व या टिल्टला एक्स्पायरी नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व मुंबई परिसरात विक्री व्यवस्था उभारण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थितांचे आभार सूर्यकांत भिसे यांनी मानले.