स्थैर्य, फलटण, दि. १७ : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मिळाले असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये संस्थेचा विकास करणे गरजेचे आहे. परंतु हे करत असताना फलटण तालुक्यांमधील साखरवाडी व राजाळे शाखांना परवानगी मिळालेली आहे. त्या दोन शाखा सक्षम पणे चालवून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला सहकाराच्या प्रवाहात आणण्यासाठी आमची संस्था कार्यरत राहील, असा विश्वास गॅलॅक्सी को-ऑप. सोसायटीचे चेअरमन सचिन यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
फलटण येथील गॅलेक्सी को-ऑप. सोसायटी लिमिटेड या संस्थेला नुकतेच सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र कामकाज करण्याची मान्यता प्राप्त झालेली आहे. यासोबतच फलटण तालुक्यातील संस्थेच्या साखरवाडी व राजाळे या दोन ठिकाणी आणि नूतन शाखेसाठी परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे. या बाबत माहिती देताना संस्थेचे चेअरमन सचिन यादव बोलत होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी काही शुल्क सध्या ग्रामीण भागातील संस्था घेत असतात. परंतु आमच्या संस्थेमध्ये कोणत्याही खातेदाराला आरटीजीएस अथवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, फलटण शाखेबरोबरच साखरवाडी व राजाळे या शाखांमध्ये ही संपूर्णतः ऑनलाईन कामकाज असेल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेवा सुविधा या त्यांच्या जवळच्या शाखेमध्ये कशा मिळतील यावरच आमचा भर असणार आहे, अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांनी यावेळी दिली.
सातारा जिल्ह्यामधील सातारा जिल्हा महिला विकास सहकारी पतपुरवठा संस्था ही गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये विलीन झाली असून त्या संस्थेच्या सर्व सभासदांना देखील सहकारातील तरतूदीपासून पासून आमची संस्था वंचित ठेवणार नाही. विलीन करून घेण्यात आलेल्या संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये आमचे जनसंपर्क अधिकारी हे आता तेथील माहिती घेऊन तेथे कार्यरत राहतील. गॅलेक्सी संस्था जास्तीत जास्त कोणत्या पद्धतीने पुढे जाईल, यासाठी कार्यरत राहील, असेही संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांनी स्पष्ट केले.
के.बी. उद्योगसमुहामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक घटकाला उत्तमात उत्तम सुविधा देण्यासाठी गॅलॅक्सी को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही कार्यरत आहे. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेची चांगली वाटचाल सुरू असून येणाऱ्या २ एप्रिल रोजी साखरवाडी शाखेचे उद्घाटन घेण्यात आलेले आहे. तसेच आगामी काही दिवसांमध्ये गॅलेक्सी सोसायटीकडून अत्याधुनिक सेवा सुविधा ह्या सज्ज असतील. गॅलेक्सी सोसायटीने फक्त दोन वर्षांमध्ये रुपये शंभर कोटींच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केलेला आहे. ग्राहक हित प्रथम हे ब्रीदवाक्य असल्याने ग्राहकांच्या हिताचाच विचार कायम संस्था विचार करीत असते.