आगामी काळात त्रिशंकू भागाचा कायापालट करणार – आ. शिवेंद्रसिंहराजे


दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । सातारा । सत्ता असो वा नसो, सातारा शहरासह आसपासच्या त्रिशंकू भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. त्रिशंकू भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कधीच कमी पडलो नाही. सातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून त्रिशंकू भाग पालिका हद्दीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या संपूर्ण भागात विकासाचा झंजावात करून भागाचा कायापालट करू, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

विलासपूर येथील दत्त चौक ते दणाणे घर व चंदूरे घर ते माने घर अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (१० लाख), कोयना सन्मित्र सोसायटी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (१० लाख) या कामांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला. या विकासकामांचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, माजी सरपंच लीलाताई निकम, बाळासाहेब पिसाळ, माजी उपसरपंच शशिकांत पारेख, महेश कुलकर्णी, आबा जगताप, सौ. नूतन हंबीरे, सौ. सुरेखा बारटक्के, भाऊसाहेब पवार, बाळासाहेब महामुलकर, निलेश निकम, आबा घाडगे, नाना पवार, शिवाजी कदम, फिरोज पठाण, अमित महिपल, नगरसेवक शेखर मोरे पाटील, विजय काळोखे, पोपटराव मोरे, प्रशांत घाडगे, सनी गायकवाड, सुनील शितोळे, विनायक निकम, धनंजय शेडगे, दादा चव्हाण, युवराज जाधव, वनिता कण्हेरकर, हेमाताई किरवे, विजय ननावरे, प्रतीक महामुनी, युवराज शेडगे, दादा फहारास, सुरेंद्र वारद आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.

त्रिशंकू भाग असल्याने येथील विकासकामांसाठी निधी मिळवणे अडचणीचे असायचे तसेच निधीसाठी मर्यादा यायच्या पण, आमदार फंड आणि इतर काही योजनांच्या माध्यमातून या भागामध्ये सातत्याने विकासकामे मार्गी लावून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या आहेत. हद्दवाढ झाल्याने यापुढे या संपूर्ण भागातील सर्वप्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असून कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!