एसटी कर्मचा-यांचे वेतन रखडणार?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य,मुंबई, दि ५ : ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे वेतनही रखडणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर सुमारे एक लाख एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. राज्य सरकारकडून रखडलेला निधी, बँकांकडून कर्ज मिळवण्याची लांबलेली प्रक्रिया यामुळे वेतनासाठी विलंब होणार आहे.

साधारण मे, जूनपासून एसटीची सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढलेले नाही. टाळेबंदीआधी मिळणारे २२ कोटी रुपये उत्पन्न सध्या ७ कोटींवर आले आहे. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट झाली असून सरकारकडून मिळणा-या निधीवर खर्चाचे गणित मांडावे लागत आहे. राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या निधीतून जुलैचे वेतन ऑक्टोबरमध्ये मिळाले. ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन अजूनही रखडले आहे. वेतन व इतर खर्च भागवण्यासाठी बँकांकडूनही कर्ज काढण्याची महामंडळाची तयारी आहे. परंतु ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी ऑक्टोबरचेही वेतन रखडणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!